मसूद अजहरने नातेवाईकांना केले संघटनेतून बाहेर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्‍या बालाकोटमध्‍ये जाऊन हवाई हल्‍ला केला आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्‍या तळांना नेस्‍तनाबूत केले होते. त्यानंतर जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहर चांगलाच बिथरला आहे. मसूद अजहरने आपल्या संघटनेतून आपल्या जवळच्या नातेवाईकांना काढून टाकले आहे. तसेच भारताने  केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या अनेक कमांडरसह त्याचा भाऊ आणि मेव्हणाही  त्यामध्ये  मारला गेला होता. त्यानंतर घाबरून त्याने संघटनेत हे फेरबदल केले आहेत.
जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली. तसेच पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी बुधवारी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. या लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेने प्रत्युत्तर देत पिटाळून लावले होते. त्यावेळी भारतीय वायुसेनेला तीन विमानांपैकी एक विमान पाडण्यात यश आले होते. पाडण्यात आलेले पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान होते.  त्यानंतरही  भारत पाकिस्तानमध्ये  कारवाया  सुरूच  आहेत.
तसेच दुसरीकडे मसूद हा पाकिस्तानमध्येच असल्याचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशीने सांगितले आहे. तसेच तो इतका आजारी आहे की घराबाहेर पडू शकत नाही अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
You might also like