Coronavirus : चिंताजनक ! ‘कोरोना’मुळं अमेरिकेत मृतांचा ‘ढीग’, एकाचवेळी दफन केले जातायेत मृतदेह (व्हिडीओ)

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  चीननंतर अमेरिकेत देखील अधिक मृत्यू होत आहेत. न्यूयॉर्कमधील मृतांचा आकडा वेगाने वाढत असून तेथे मृतांचा ढीग लागत आहे. यामुळे आता तेथे एकसाथ अनेक मृतदेह दफन केले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये गुरुवारी ७९० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून याच्या एक दिवस अगोदरच ७३१ जण दगावले. तर मागच्या शुक्रवारी ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाटासारख्या दिसणाऱ्या खड्ड्यात होत आहेत मृतदेह दफन

न्यूयॉर्कमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी पाटासारखे दिसणारे खड्डे खोदले जात आहेत. मशीनच्या सहाय्याने हे खड्डे तयार केले जात असून ताबूत देखील मशीनच्या मदतीनेच मृतदेह खड्यात ठेवले जात आहेत. मृतदेह शहरांपासून लांब दफन केले जात असून यात फक्त मृतदेह दफन करणारेच लोकं दिसत आहेत.

अमेरिकेतील न्यूयॉर्कला कोरोनाचा जास्त फटका बसला असून मृतांचा आकडा वाढू शकतो. ११ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २,७५३ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कोरोनामुळे फक्त न्यूयॉर्कमध्ये ७,०६७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती येथील गव्हर्नर अँड्र्यू कुओमी यांनी दिली.