NRC आणि CAA कायद्याविरोधात मास मुव्हमेंट संघटनेची महाराष्ट्र बंदची ‘हाक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २ जानेवारी २०२० रोजी मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जगताप यांनी मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ८ जानेवारी २०२० सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

देशातील अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आत्महत्या, शिक्षण, स्त्रियांवरील अत्याचार हे प्रश्न सोडून भाजपा सरकार जनतेला मूळ मुद्यापासून दुर्लक्षित करत आहे. त्या कायद्यामुळे या देशातील 40% शोषित-पीडीत जनता हद्दपार होणार आहे. असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जगाताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संघटनेसोबत NRCआणि CAA कायद्यायला विरोध करणाऱ्या 400 ते 500 संघटना महाराष्ट्र बंद मध्ये उतरणार आहेत.

NRC आणि CAA या कायद्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलने चालू आहेत. हा कायदा लोकांच्या मनात नसताना लोकांवर लादला जातोय . तरी अनेक राज्य हा कायदा आपल्या राज्यात राबविणार नाहीत, हीच भूमिका घेत आहेत. तरी मास मुव्हमेंट आमची लढाऊ संघटना NRC आणि CAA या कायद्या विरोधात 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 ते 5 महाराष्ट्र बंद करणार आहे ,असे मास मुव्हमेंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/