अरे देवा ! 16 व्या वाढदिवसाला विद्यार्थ्यानं घेतला 2 मित्रांचा ‘जीव’, ‘फायरिंग’नंतर स्वतःला मारली ‘गोळी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 16 वा जन्म दिवस साजरा करणाऱ्या कॅलिफोर्नियातील एका तरुणाने शाळेतील आपल्या मित्रांवर हल्ला केला आणि आपल्याकडे असलेल्या सेमी ऑटोमॅटिक पिस्तोलने दोघांचाही जीव घेतला. या हल्ल्यामध्ये अन्य दोन मुलीसुद्धा जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे यानंतर हल्ला करणाऱ्या मुलाने स्वतःला देखील गोळी मारून घेतली आहे. त्यामुळे जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

16वें बर्थडे पर छात्र ने ली अपने दो साथियों की जान, फायरिंग के बाद खुद को भी मार ली गोली

सांता क्लारिता मधील सौगुस हाई स्कूलमध्ये सकाळी अचानक झालेल्या फायरींगमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. सूचना मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्यांपैकी दोघांची हालत अत्यंत गंभीर आहे. यामध्ये आधीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे.
Mass_Shooting_In-America3

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांच्या वडिलांचा 2017 मधेच मृत्यू झालेला आहे तेव्हापासून तो खूप डीस्टब होता. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे वय 14 आणि 16 वर्ष इतके होते. नैथेनील बेरहोव असे हल्लेखोराचे नाव आहे ज्याने स्वतः देखील गोळी मारून घेतली आहे.

Mass_Shooting_In-America1

या घटनेनंतर पोलिसांनी शाळा बंद केली आणि या बाबतचा अधिक तपास सुरु केला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेरहोव हा अत्यंत लाजाळू आणि शांत स्वभावाचा मुलगा होता तसेच त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन लागले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

Visit : Policenama.com