फ्लोरिडात अंधाधुंद गोळीबारात ४ जण ठार ११ लोक जखमी

फ्लोरिडा : वृत्तसंस्था

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जॅक्सनविल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ४ जण ठार तर ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. जॅक्सनविल लँडिंग परिसरातील एका रेस्तराँमध्ये संशयित हल्लेखोरांनी जमावावर अचानक गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी जॅक्सनविलकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून गोळीबार करणाऱ्या संशयित व्यक्तीवर पोलिसांनी गोळीबार करुन त्याला ठार केले आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0537338e-a9ad-11e8-837b-41a5525ae1aa’]

प्राथमिक माहितीनुसार, जॅक्सनविल येथील गोळीबारात जखमी व्यक्तींना स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संशयित हल्लेखोर ठार झाला आहे. आणखी एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर पोलिसांचे पथक लोकांच्या बचावासाठी आणि दुसऱ्या हल्लेखोराच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे. मात्र दुसरा संशयित घटनास्थळी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पोलिसांनी गोळीबाराची घटना घडल्यानंतर लँडिंग एरियाजवळ जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. तसेच स्थानिकांच्या मदतीसाठी एक क्रमांक प्रसिद्ध केला आहे.  पोलिसांनी एक शोधमोहीम हाती घेतली असून, स्थानिक रहिवाशांना संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.