दहशतवाद्यांकडून नरसंहार ! फुटबॉलच्या मैदानावर 50 जणांची क्रूरतेने हत्या

मोझांबिक : वृत्त संस्था – आफ्रिकी देश मोझांबिकमधील काबो डेलडागो प्रांतामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी मोठा नरसंहार (massacre-football-field-50-people-brutally-killed-terrorists-isis) घडवला आहे. एका फुटबॉल मैदानात 50 हून अधिक लोकांची मुंडकी उडवून (By blowing people’s heads) दिली आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या शरीराचे तुकडे- तुकडे करून गावाच्या आजूबाजूच्या जंगलात तसेच फुटबॉल मैदानात फेकल्याचे आढळून आले आहे. हत्याकांडामध्ये 15 लहान मुलांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे काबो डेलडागो प्रांत हादरले आहे.

मोझांबिकच्या सरकारी मीडियानुसार, दहशतवाद्यांनी सोमवारी अनेक गावांवर हल्ला केला. महिला आणि मुलांचे अपहरण केले. यानंतर तेथील लोकांना फुटबॉलच्या मैदानावर घेऊन गेले. येथे त्यांची क्रूरतेने हत्या केली. रायफली हातात घेऊन दहशतवादी नारे देत होते. त्यांनी ग्रामस्थांच्या घरांना आगीदेखील लावून दिल्या. काबोच्या डेलडागो प्रांतामध्ये आयएसआयएसचे दहशतवादी 2017 पासूनच असे हल्ले करत आले आहेत. तेव्हा 200 हून जास्त लोकांची हत्या केली होती. तेव्हापासून आतापर्यंत 2000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर चार लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. गेल्या मार्चमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबुल ISIS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्याने हादरली होती. मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुद्वारावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण जखमी झाले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुन्हा शिखांच्या निवासी कॅम्पजवळ बॉम्बहल्ला केला होता. या प्रकारावर भारतीय दूतावासाने नाराजी व्यक्त केली आहे. हा हल्ला या देशांतील अल्पसंख्याकांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता. तसेच दु:ख व्यक्त केले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही निषेध व्यक्त करताना कोरोना व्हायरस पसरलेला असताना अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. यामुळे हल्लेखोरांची सैतानी मानसिकता उघड होत आहे, असे म्हटले होते..

भारत लक्ष्यावर
दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात चेतावणी दिली आहे की, केरळ आणि कर्नाटकात ISIS च्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक असू शकते आणि भारतीय उपखंडातील अल कायदाच्या दहशतवादी संघटना या भागात असल्याचेही त्यांनी नमूद करत हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत. या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.