नागपूर : कळमेश्वर-सावनेर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भिषण अपघात, पाच ठार 

कळमेश्वर (नागपूर) : पोलीसनामा ऑनलाईन

मोहरम निमित्त दर्ग्याकडे निघालेल्या भाविकांच्या रिक्षाला भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या भिषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन चिमुकले, एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी चार वाजता नागपूर जिल्ह्यातील  कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात झाला.
[amazon_link asins=’B078124279,B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’068976aa-bcd8-11e8-9acf-bf83afe37ab4′]

मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दर्ग्याकडे रिक्षाने जात होते. कळमेश्वर – सावनेर मार्गावर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातात मृत्यू झालेल्या पाचही मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काहींच्या मते मृतक हे नागपुरातील राहणारे असून तर काहींच्या मते ते हैदराबाद येथील राहणारे आहेत. मात्र जखमी असलेल्यांपैकी एकाने सांगितले कि, नागपुरातील नातेवाईकाकडे ते पाहुणे म्हणून आले होते. त्यामुळे मृतकांची ओळख पटल्यानंतरच ते कुठेचे राहणारे आहे, हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.