एयर इंडियाच्या प्रवाशांचा डाटा लीक, 45 लाख पॅसेंजर्सच्या क्रेडिट कार्डसह इतर माहिती प्रभावित

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारी एयरलाईन्स कंपनी एयर इंडियाचा डाटा लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कंपनीनुसार, या घटनेने 45 लाख प्रवाशांचा डाटा प्रभावित केला आहे. कंपनीने म्हटले की, यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती ज्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ, कॉन्टॅक्ट, पासपोर्टची माहिती, तिकिटाची माहिती, स्टार अलायन्स, एयर इंडिया फ्रिक्वेंट फ्लायर डाटा (पासवर्ड डाटा प्रभावित झालेला नाही) आणि क्रेडिट कार्डच्या माहितीचा समावेश आहे.

एयर इंडियानुसार, डाटा ब्रीचची ही घटना 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यानची आहे. कंपनीने क्रेडिट कार्डच्या संबंधीत म्हटले की, आमच्या डेटा प्रोसेसरकडे सीव्हीव्ही/सीव्हीसी नंबर नसतात. नंतर आमच्या डाटा प्रोसेसरने हे जाणून घेतले की, प्रभावित सर्व्हरवर कोणत्याही प्रकारची असामान्य हालचाल दिसून आलेली नाही.

कंपनीने काय केले ?
एयर इंडियानुसार, ही घटना समोर आल्यानंतर ताबडतोब त्यांनी याची चौकशी केली. प्रभावित सर्व्हर सुरक्षित करण्यात आला. क्रेडिट कार्ड जारी करणार्‍यांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना सूचित करण्यात आले. सोबतच एयर इंडिया एफएफपी प्रोग्रामचा पासवर्ड रिसेट करण्यात आला.

डाटा सुरक्षित रहावा यासाठी कंपनीने प्रवाशांना सांगितले की, त्यांनी आपले पासवर्ड बदलावेत. वक्तव्यात एयर इंडियाने म्हटले की, आम्ही आणि आमचे कारवाई सुरू ठेवणार आहोत, या दरम्यान प्रवाशांना पासवर्ड बदलण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. प्रवाशांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.