वाळवंटी प्रदेशात आढळली 2000 वर्ष जुनी 121 फूटी लांब ‘मांजर’ !

लिमा : वृत्तसंस्था – जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात आणि सापडत देखील असतात. पेरुमधील वाळवंटी प्रदेशात पृथ्वीवरील आणखी एक ‘आश्चर्य’ सापडले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना सुमारे 2200 वर्ष जुन्या मांजराची मोठी रेखाचित्र आढळली आहे. डोंगरावर आढळलेल्या या मांजराची आकृती 121 फूट लांब आहे. ही आकृती नाज्का संस्कृतीचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

आजपर्यंत या भागात अनेक मोठ्या आकाराच्या आकृती आढळून आल्या आहेत. ही मांजराची आकृती अलास्काहून अर्जेंटिनाला जाणाऱ्या एका महामार्गाच्या जवळील एका डोंगराजवळ आहे. नाज्का लायन्समध्ये आतापर्यंत 300 हून अधिक वेगवेगळ्या आकारांच्या आकृती आढळल्या आहेत. यामध्ये पशू आणि ग्रहांचा समावेश आहे. पुरात्वशास्त्रज्ञ जॉनी इस्ला यांनी सांगितले की, जेव्हा पर्यटकांसाठी बनवण्यात आलेले पॉईंट्स स्वच्छ केले असताना मांजरीचे रेखाचित्र आढळून आले. पर्यटकांना सहजपणे रहस्यमयी नाज्का लाइन्स पाहता यावेत यासाठी ही स्वच्छता करण्यात येत असताना ही मांजराची आकृती आढळून आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे दोन हजार वर्षापूर्वी, त्या काळातील लोकांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाविना ही चित्रे तयार केली होती. ही चित्रे केवळ आकाशातूनच दिसू शकतात.

इस्ला यांनी पुढे सांगितले की, आम्ही रेखाचित्रांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करत असताना आम्हाला काही रेषा आढळल्या. या रेषा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे आढळून आले. आणखीही काही ठिकाणी अशा प्रकारच्या रेषा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मागील काही वर्षात आम्ही ड्रोनच्या मदतीने डोंगराच्या सर्व भागांचे फोटो घेण्यास यशस्वी झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

पेरुच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार, अनेक आठवड्यापर्यंत संरक्षण आणि स्वच्छतेची कामे केल्यानंतर मांजरीची आकृती दिसून आली. ही संपूर्ण आकृती 121 फूट लांबीची आहे. या मांजीरीच्या आकृतीला इसवीसनपूर्व 2000 मध्ये तयार करण्यात आल्याची माहिती पुरात्वविभागाने दिली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पेरुच्या या वाळवंटी प्रदेशात 140 नाज्का लाइन्स आढळून आल्या होत्या जपानी संशोधकांनी ड्रोन आणि एआयच्या मदतीने 15 वर्षापर्यंत संशोधन केले. या 140 नाज्का लाइन्समध्ये एक पक्षी, मानवी चेहऱ्यासारखा एक प्राणी, दोन तोंडी साप आणि एक व्हेल मासा आढळून आला.