उग्रवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 3 जवानांना वीरमरण तर 6 गंभीर, मणिपूरच्या चंदेर जिल्ह्यातील घटना

इंफाळ : वृत्तसंस्था – मणिपूरमध्ये तीन जवानांना वीरमरण असून सहा जवान गंभीर जखमी झालेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास घडलीय मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळपासून साधारणत 95 किलोमीटर दूर चंदेर जिल्ह्यात. चंदेर जिल्ह्यात उग्रवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला आहे. जखमी जवानांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक उग्रवादी संघटना पिपल्स लिबरेशन आर्मीने जवानांवर हल्ला केला. यावेळी लष्कराने उग्रवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केलीय. भारत आणि म्यानमारच्या सीमेवरही सतर्कतेचे आदेश दिलेत. भारत-म्यानमार सीमेवर असलेल्या उग्रवादी गटांविरोधात शोधमोहीमेवेळी हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात चार आसाम रायफल्सच्या तीन जवानांना वीरमरण आले. तर, सहा जवान हल्ल्यात जखमी झालेत. जखमींना लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे.

मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या तळावर उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी उग्रवाद्यांनी सैनिकी तळावर बॉम्ब फेकले होते. त्यानंतर गोळीबार दोन्हीकडून झाला होता. मात्र, त्यावेळी लष्कराची कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.