लेबनानची राजधानी बेरूत मध्ये भीषण स्फोट ! अनेक लोक जखमी, काळजाची धडकी भरवणारा व्हिडीओ

बेरूत : वृत्तसंस्था – लेबनानची राजधानी बेरूत मंगळवारी जबरदस्त बॉम्ब स्फोटाने हादरली. या स्फोटात अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. स्फोट इतका शक्तीशाली होता की, शहराचा बहुतांश भाग हादरला. स्थानिक लोकांनी सांगितले की, स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांच्या काचा तुटून पडल्या.

लेबनानच्या मीडियाने स्फोटानंतर मलब्यात अडकलेल्या दोन लोकांची छायाचित्रे जारी केली आहेत, ज्यामध्ये काहीजण रक्ताने माखलेले दिसत आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. बेरूतच्या पोर्ट भागत झालेल्या या स्फोटाचा धक्का शहराच्या बहुतांश भागात जाणवला आणि काही ठिकाणी वीज सुद्धा गेली.

लेबनानच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बेरूत पोर्टवर झालेल्या एखाद्या घटनेमुळे झालेला असू शकतो. एका स्थानिक नागरिकाने ट्विट केले की, इमारती हलत आहेत.

तर अन्य एका व्यक्तीने लिहिले की, एक जबरदस्त आणि कान बहिरे करणार्‍या स्फोटाने बेरूतला हादरवले आहे, अनेक मैलांवर हा आवाज ऐकू आला. लेबनानमधील वृत्तपत्रांच्या ऑनलाइन फुटेजमध्ये तुटलेल्या खिडक्या, अत्यावस्थ पडलेले फर्निचर आणि तुटलेले सिलिंग दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like