स्फोटाने हादरली लेबनानची राजधानी बेरूत, 78 जणांचा मृत्यू तर 3700 जण जखमी

बेरूत : वृत्त संस्था – लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तब्बल 4000 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. लेबनानच्या राष्ट्रपतींनी बेरूतमध्ये दोन आठवड्यांसाठी इमर्जन्सी लागू केली आहे. राष्ट्रपतींनी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक सुद्धा बोलावली आहे.

रॉयटर्सनुसार, आरोग्य मंत्र्यांनी 78 लोकांचा मृत्यू आणि सुमारे चार हजार लोक जखमी झाल्याची माहिती दिली आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार लेबनानचे पंतप्रधान हसन दिआब यांनी म्हटले की, बंदरामध्ये 2750 टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला.

लेबनान न्यूज एजन्सी एनएनए आणि सुरक्षा सूत्रांनी म्हटले की, स्फोट शहरातील बंदर क्षेत्रात झाला. तर एका सूत्राने म्हटले की, या भागात केमिकल्स ठेवले होते. सोशल मीडियावर लोकांनी टाकलेल्या फुटेजमध्ये बंदरातून धूर निघताना दिसत आहे, ज्यानंतर मोठा स्फोट झाला.

लेबनानी आरोग्य मंत्रालयाच्या संदर्भाने एका वृत्तसंस्थेने 73 लोकांचा मृत्यू आणि 3700 लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. आरोग्य मंत्र्यांनी म्हटले की, जखमींची संख्या खुपच जास्त आहे. यूएनचे प्रवक्ते फरहान हक यांनी म्हटले की, स्फोट कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. आमच्याकडे याबाबत माहिती नाही.

स्फोटामुळे सूंपर्ण शहरातील काचा फुटल्या आहेत आणि लोक सैरावैरा फिरत आहेत. ज्या पोर्टजवळ स्फोट झाला, तेथे वेयरहाऊस सुद्धा आहे. रायटर्सनुसार स्फोटामुळे लेबनानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाचे सुद्धा नुकसान झाले आहे.

संयुक्त राष्ट्र शांती सेनेच्या जहाजाचे सुद्धा नुकसान
बेरूतमध्ये झालेल्या स्फोटामुळे तैनात संयुक्त राष्ट्र शांती सेनेच्या मेरीटाइम टास्क फोर्सच्या एका जहाजाचेही नुकसान झाले. अनेक शांती सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे, यापैकी अनेक अत्यावस्थ आहेत. जखमींना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शांती मिशनचे हेड आणि फोर्स कमांडर मेजर जनरल डेल कॉल यांनी म्हटले की, या कठिण काळात आम्ही लेबनानचे लोक आणि सरकार सोबत आहोत. आम्ही सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत.

अमेरिका, फ्रान्सने व्यक्त केली एकजुट
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमेनुएल मॅक्रो यांनी ट्विट करून लेबनानसोबत एकजुट व्यक्त करत मदतीचा हात पुढे केला आहे. ब्रिटन आणि इराणच्या नेत्यांनी सुद्धा लेबनानसोबत एकजुट व्यक्त करत ट्विट केले आहे. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनी बेरूत स्फोट हा दहशतवादी हल्ला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like