लासलगावला बाडदान गोदामाला भीषण आग

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील साईबाबा ट्रेडिंग कंपनीचे लासलगाव-विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम असून त्या ठिकाणी ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे. यावेळी मोठ्या संख्येने मजूर वर्ग काम करत होता आग लागल्याचे समजताच मजूर वर्गाने पळ काढल्याने जीवित हानी टळली.

याबाबत अधिक माहिती अशी की लासलगाव येथील कांदा निर्यातदार कांतीलाल सुराणा यांचे मालकीचे साईबाबा ट्रेडिंग कंपनी या नावाने लासलगाव-विंचूर रोड येथे कांद्याचे खळे आहे दि ९ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गोडाऊनमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाले सदरची आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ लोळ उठत होते या आगीमुळे गोदमा मध्ये ठेवलेले बाडदान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. सध्या बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून सदरचे सुराणा हे मोठे कांदा खरेदीदार व्यापारी आहे. त्यामुळे या व्यापाऱ्याच्या खळ्यात मोठ्या प्रमाणात मजूर काम करत होता. आग लागली यावेळी मोठ्या संख्येने मजूर वर्ग त्या ठिकाणी काम करत होता ही आग लागल्याचे समजताच मजूर वर्गाने पळ काढल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही आग कशामुळे लागली हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.