पिंपरीमध्ये भंगाराच्या गोदामांना भीषण आग ; ४ गोदामं जळून खाक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिखली कुदळवाडी येथे अचानक आग लागल्याने भंगार साहित्याची चार गोदामे जळून खाक झाली. ही आग आज पहाटे पाचच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज मोरे आणि निकेश मोरे यांची ४ गोडाऊन जाळून खाक झाली. नुकतीच आग नियंत्रणात आली असून कुलींगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. आग कश्यामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.