Mumbai : सिटी सेंटर मॉलला भीषण आग, 500 हून अधिक जणांची सुखरूप सुटका, 2 फायरमन जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली आहे. मागील १२ तासांहून जास्त वेळ ही आग विझवण्याचे काम अग्निशामक दलाकडून सुरु आहे. आगीची भीषणता पाहता अग्निशामक दलाकडून ‘ब्रिगेड’ कॉल घोषित केला आहे. आतापर्यंत ५०० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. आग विझवताना अग्निशामक दलाचे २ कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहे.

नागपाडा परिसरातील तळमजला अधिक तीन मजली सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर मोबाईल शॉपीला लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यानंतर बघता बघता आग सर्व मॉल मध्ये पसरली. त्यामध्ये २०० अधिक दुकानांना याचा फटका बसला आहे. यातील बहुतांश दुकाने मोबाईलची आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या २४ गाड्या, ६ वॉटर टँकर, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

लेव्हल ५ ची आग असल्याने मुंबईतील सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. तद्वतच, अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी शशिकांत काळे यांच्यासोबत सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सिटी सेंटर मॉलला लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीतील अंदाजे ३,५०० रहिवाशांचे सुरक्षितेच्या कारणास्तव जवळील मैदानात स्थलांतर केले आहे. घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरलिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like