कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; ४९ बंधारे पाण्याखाली; १७ घरांची पडझड

कोल्हापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

प्रतिनिधी : शिल्पा माजगावकर

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळं ४९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. झांबरे धरणातून विसर्ग वाढवल्याने चंदगड-तिलारी-गोवा मार्ग ठप्प झाले आहेत. झांबरे धरणातून विसर्ग वाढल्याने चंदगड तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अणूस्कुरा घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. अणूस्कुरा घाटातील दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवरील सुरू झाले असून शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास पंचगंगा इशारा पातळी गाठू शकते. त्यामुळं नदी काठच्या गावांना सतर्क तेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27c8c717-85e3-11e8-bb21-937f138928ce’]

राधानगरी, दूधगंगा, तुळशी, वारणा सह जिल्यातील इतर सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. आज़रा, चंदगड, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यात १७ घरांची पडझड झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झली नाही. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील ५ राज्य मार्गासह ११ जिल्हा मार्गावर पाणी आलं असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे वळविण्यात आली. राजापूर आगारातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या भूईबावडामार्गे वळविण्यात आल्या आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रकडून येणाऱ्या गाड्या त्याचमार्गे आल्या. अन्य खाजगी वाहतूक आंबा घाटासहीत भूईबावडा मार्गे सुरु होती. दरम्यान, घाटातील कोसळलेली दरड हटविण्याचे काम संबंधीत बांधकाम विभागाच्यावतीने सुरु होते. जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवसभर काम सुरु होते. घाटात दरड कोसळल्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या अणुस्कुरा पोलीस चेकपोस्टवरील तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अणुस्कुरा घाटात अधून मधून कोसळणाऱ्या दरडीमुळे घाटातून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. तसंच अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याच काम उद्याही सुरु राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.