श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुण्यातील नवीन मराठी शाळेत श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिरामध्ये तरुणाईचा मोठ्या संख्येने सहभाग पाहण्यास मिळाला असून श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट स्वयंसेवक दिनेश देशकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी लक्ष्मण सिंह नलावडे म्हणाले की,” या रक्तदान शिबिराचे मागील कित्येक वर्षांपासून आयोजन केले जाते. यास प्रत्येक वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळत असून यंदा देखील गतवर्षीच्या तुलनेत अधिकच प्रतिसाद मिळत आहे. या रक्तदान शिबिरात अधिकधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नगरसेविका सोनाली लांडगे म्हणाल्या की,”रक्तदान हे श्रेष्ठदान असून कार्यात समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होऊन समाजाची वेगळ्या प्रकारे सेवा करावी.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

You might also like