विशाखापट्टणममधील गॅस गळतीचे दृश्य पाहून सचिन झाला ‘भावूक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट सुरु असतानाच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने तत्परतेने पाच गावे रिकामी केली होती. घटनेनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून गॅसगळतीचे दृश्य हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांनीदेखील या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विशाखापट्टणमधून समोर आलीली दृश्य ही हृदयद्रावक आहेत. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाल्या त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. घटनेमुळे आजारी पडलेले लोक लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो, अशी भावना सचिनने ट्विट करून व्यक्त केली आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशाखापट्टणमध्ये घडलेली ही घटना अतिशय दुर्देवी आहे. माझ्या प्रार्थना सर्वांसोबत आहेत, असे मत टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले आहे.

शाखाटपट्टणममधील दुर्देवी घटनेत ज्या लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावले त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. जे लोक रुग्णालयात दाखल आहेत ते त्वरित बरे व्हावे अशी मी प्रार्थना करत आहे, असे विराट कोहली म्हणाला.