Credit Card च्या व्यवहारांवर मोठा धोका ठरू शकते Android App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही शॉपिंग स्टोरवर तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड या दोन माध्यमातून पेमेंट करता येऊ शकते. यामध्ये पहिले माध्यम कॉन्टॅक्सलेस टॅपचा आहे. ज्या माध्यमातून तुम्ही भारतात 5 हजार रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. तर दुसरीकडे तुम्हाला पेमेंट टर्मिनलवर कार्डच्या PIN ची गरज लागते. मात्र, या माध्यमातून हॅकर्सकडून तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.

एका अभ्यासातून हे समोर आले, की हॅकर्स सध्या अँड्राईड ऍपचा वापर करून तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात. काहीवेळा पेमेंट करताना तुम्हाला कोणत्याही PIN ची गरज भासत नाही. ETC Zurich च्या रिसर्चने याबाबत सांगितले, की Mastercard किंवा Maestro चे क्रेडिट कार्डचा बायपास पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी अशा पद्धतीचा वापर Visa Credit किंवा Debit कार्डवरही सुरु होता.

अशाप्रकारे केला जातो गैरव्यवहार
दोन सेशन एकावेळी काम करणे गरजेचे आहे. कार्ड टर्मिनलवर व्हिजा ट्रान्झॅक्शनची प्रक्रिया पूर्ण होते तर मास्टरकार्ड ट्रान्झॅक्शन करतो. त्यामुळे दोन मास्टरकार्डचा वापर केला. याशिवाय दोन Maestro कार्डही वापरले. पण हे चारही कार्ड वेगवेगळ्या बँकांचे होते. त्यानंतर Android App च्या माध्यमातून केला गेलेला व्यवहार धोक्याचा ठरू शकतो.

मास्टरकार्डला दिली माहिती
अभ्यासकांनी सांगितले, की मास्टरकार्डला या धोक्याबाबत माहिती दिली आहे. कॉन्टॅक्टलेस पेमेंट कार्ड्सच्या सुरक्षेत ही कमी प्रामुख्याने EMV मुळे आहे. EMV एक प्रकारचा इंटरनॅशनल प्रोटोकॉल असतो. त्याला अशाप्रकारे कार्डवर वापरला जातो.