Mastercard Barred | RBI ने मास्टर कार्डवर आणली बंदी ! बँक जारी करू शकणार नाही Master Debit आणि Credit Card, आता काय होणार कोट्यवधी ग्राहकांचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mastercard Barred | केंद्रीय बँक आरबीआय (RBI) ने बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांद्वारे नवीन डेबिट (Debit) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) जारी करण्याबाबत बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने मास्टरकार्ड जारी करण्यावर प्रतिबंध (Mastercard Barred) लावला आहे. आता बँका नवीन किंवा जुन्या ग्राहकांना Master Debit आणि Credit Card जारी करू शकणार नाहीत. आरबीआयचा हा निर्णय 22 जुलैपासून लागू होईल.

बँकांकडून जे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी केले जातात, ते कंपन्या बनवतात. यापैकी एक आहे – मास्टरकार्ड आशिया/पॅसिफिक पीटीई लिमिटेड (मास्टरकार्ड). मास्टरकार्ड एक पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे, जी पीएसएस कायद्यांतर्गत (PSS Act) देशात कार्ड नेटवर्क संचालित करण्यासाठी अधिकृत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी Mastercard Asia / Pacific Pte Ltd वर कारवाई करत 22 जुलैपासून कार्ड नेटवर्कवर नवीन स्थानिक डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड ग्राहकांना सहभागी करण्यास प्रतिबंध लावला आहे.

का करण्यात आली कारवाई?

आरबीआयकडून जारी निवेदनानुसार, कंपनीने पेमेंट प्रणाली डेटाच्या स्टोरेजबाबत आरबीआयच्या मापदंडाचे उल्लंघन केले आहे. यासाठी आरबीआयने मास्टरकार्डवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रतिबंध पेमेंट सेक्शन 17 आणि सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्ट 2007 च्या अंतर्गत लावण्यात आला आहे.

अनेकदा दिली संधी
रिपोर्टनुसार, मोठ्या कालावधीपासून कार्ड जारी करणार्‍या कंपन्याना याबाबत इशारा दिला होता. केंद्रीय बँकेने एका वक्तव्यात म्हटले, पुरेशी संधी देऊनही, कंपन्या पेमेंट प्रणाली डेटाच्या स्टोरेजच्या निर्देशांचे पालन करत नव्हत्या. यासाठी करवाई करण्यात आली.

काय होणार ग्राहकांवर परिणाम
RBI च्या निर्णयानंतर बँक नवीन मास्टर कार्ड जारी करणार नाही.
मात्र, रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, जुनी मास्टर कार्ड जारी राहतील.
याचा अर्थ स्पष्ट आहे जुन्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर सर्व सर्व्हिस पहिल्याप्रमाणे जारी राहील.
आरबीआयच्या आदेशाचा मास्टरकार्डच्या सध्याच्या ग्राहकांवर कोणताही प्रभाव पडणार नाही.
आरबीआयद्वारे जारी वक्तव्यात म्हटले आहे की,
मास्टरकार्ड डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यार्‍या सर्व बँका आणि विना बँकिंग संस्थाना या निर्देशांचे पालन करण्याचा सल्ला दईल.

मास्टर कार्ड अमेरिकन कंपनी आहे.
तिचे मुख्यालय, न्यूयॉर्कमध्ये आहे.
या कंपनीची स्थापना सन 1979 मध्ये इंटर बँक ट्रांजक्शनसाठी झाली होती.
सुरुवातीच्या काळात ती केवळ अमेरिकन बँकांमध्ये होणार्‍या आर्थिक सेवांशी संबंधीत होती.
आता ती जवळपास 160 देशांमध्ये सर्व्हिस देत आहे.
तिच्या अंतर्गत अनेक प्रकारची कार्ड जारी केली जातात.

Web Titel :-  Mastercard Barred | rbi alert today mastercard barred by rbi from adding new clients in india for non compliance with local data storage norms

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Update | तुमच्या आधार कार्डमध्ये चुकीचा मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदला गेलाय का, ‘या’ पद्धतीने तपासा

Today petrol price | पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | एमडी डॉक्टर सुजित जगतापने या अगोदरही लावला होता महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा