पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टरमाईंड मुळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टर माईंड रूषीकेश देवडीकर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबचा आहे. नुकतीच देवडीकर याला कर्नाटक पोलीसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यावेळी त्याच्या औरंगाबादचे कनेक्शन समोर आले आहे.

रूषीकेश भास्कर देवडीकर (वय 44) असे नाव आहे. रूषीकेश याचे वडिल भास्कर देवडीकर यांचा टायपींग इनस्ट्युटचा व्यावसाय होता. त्यांना दोन मुल होती. त्यातील रूषीकेश दोन क्रमांकाचा मुलगा होता. देवडीकर कुटूंबिय 1999 मध्ये कळंबमधील जमीन तसेच घर विक्रीकरून औरंगाबाद येथे स्थायिक झाले. याच ठिकाणी रूषीकेश याचा विवाहही झाला. रूषीकेश हा आई-वडिल, भाऊ, पत्नी तसेच मुलांसोबत औरंगाबाद येथे राहत होता. औरंगाबादमधील एन 9 सिडको भागात तो पंतजलीचे दुकान चालवित होता. तो सनातन संस्थेचा साधक असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, अचानकच रूषीकेश याने तीन ते चार वर्षांपुर्वी औरगांबाद शहर सोडले आणि तो सोलापूरात राहू लागला. तो येथील एका पेट्रोल पंपावर काम करत असल्याची माहिती आहे. सोलापूरमधून तो झारखंडमध्ये कधी गेला याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/