Micromax आणखी एक स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही वर्षांपूर्वी भारतीय मोबाईल मार्केटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मायक्रोमॅक्स ( Micromax) मोबाईल कंपनीने पुन्हा बाजारात उडी घेतली आहे. या भारतीय कंपनीने बाजारात दोन बजेट फोन लाँच करत चिनी कंपन्यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नवीन फोन बाजारात आणला आहे.

या नवीन फोनचे नाव (Micromax In 1b Go edition) असण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्रॉईड गो ऑपरेटिंग सिस्टिमवर (Android Go Operating System) आधारित असणार आहे. या फोनची टक्कर रियलमी, शाओमी या कंपन्यांच्या स्वस्त ब्रँडसोबत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचे दोन व्हेरिएंट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ( 2GB RAM + 32GB) आणि (4GB RAM + 64GB) व्हेरिएंटमध्ये असेल. याविषयी अधिक माहिती अजून समोर आलेली नाही. यापूर्वी मायक्रोमॅक्सने बाजारात आणलेल्या दोन स्मार्टफोनविषयी आपण जाणून घेणार आहोत.

1) Micromax In 1B
Micromax In 1B हा खूप स्वस्तात मिळणारा स्मार्टफोन आहे. 6.5 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. माठीमागे 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 5000mah बॅटरी यामध्ये दिली आहे. हा मोबाईल अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार असून, यामध्ये अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ हा फोन वापरता येऊ शकतो.

2) Micromax In Note 1
काही महिन्यांपूर्वी लाँच केलेल्या दोन स्मार्टफोनमध्ये या फोनचादेखील समावेश होता. Micromax In Note 1 च्या 4GB RAM प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये, तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 12 हजार 499 रुपये आहे. या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी 85 प्रोसेसर दिला आहे.या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिलीआहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, तसेच 5 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.