अतिरिक्‍त गृह सचिवांना (ACS Home) २५००० चा दंड का करण्यात येऊ नये : ‘मॅट’ कोर्टाकडून नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल 636 पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रकरणात आज मॅट कोर्टाने अतिरिक्‍त मुख्य सचिव (गृह) यांना 25 हजार रूपयांचा दंड का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस काढली आहे. पोलिस उपनिरीक्षकांची भरती प्रक्रिया अवैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर देखील त्यांना सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता.

मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे थेट परिक्षा देवुन पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरलेले तसेच फौजदार पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना जागा रिक्‍त नसल्यामुळे नियुक्‍तीपासुन दूरच रहावे लागले होते. त्यामुळे त्यांनी मॅट कोर्टाकडे धाव घेतली होती. मॅट कोर्टामध्ये देखील सुनावणी झाली. त्यामध्ये मॅट कोर्टाने देखील गृह विभागाने आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चुकाचा असल्याचे सांगुन त्या 636 पोलिस उपनिरीक्षकांच्या नियुक्‍तीला हरकत घेतली होती. मॅट कोर्टाच्या हरकतीकडे देखील गृह विभागाने दुर्लक्ष केले आणि संबंधित पोलिस उपनिरीक्षकांची नियुक्‍ती कायम ठेवली. त्यावर आज मॅट कोर्टाने अतिरिक्‍त गृह सचिवांना 25 हजार रूपयांचा दंड का करण्यात येऊ नये असा सवाल केला असून त्याबाबत नोटिस देण्यात आली आहे.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप