मॅच फिक्सिंग : आणखी एका भारतीय खेळाडूला अटक, ‘दलाली’चं काम करायचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणात पोलिसांनी आणखी एका खेळाडूला अटक केली आहे. गुन्हे शाखेने शिवमोगा लायंस या संघाचा खेळाडू निशांत शेखावत याला दलाली करणे आणि सट्टेबाजांच्या संपर्कात असल्यामुळे अटक केली आहे. याआधी गुन्हे शाखेने बेंगलुरु ब्‍लास्‍टर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक वीनू प्रसाद आणि फलंदाज एम विश्‍वनाथन याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशांत शेखावत आणि वीनू प्रसाद यांनी 2018 हंगामात बेंगलुरु ब्‍लास्‍टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात झालेल्या सामन्यात फिक्सिंग केली होती. यावेळी दोघांनी एम विश्‍वनाथन याला देखील फिक्सिंगसाठी प्रेरित केले होते. या दोघांच्या सांगण्यावरून एम विश्‍वनाथन याने या सामन्यात 20 चेंडूवर 20 पेक्षा कमी धावा करून बाद होण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता.

या सामन्यात त्याने आपले टीशर्ट वर करून आपली बॅट बदलून त्यांना फिक्सिंगचा पुरावा दिला होता. या सामन्यात तो 17 चेंडूवर 9 धावा करून बाद झाला होता. यासाठी त्याला जवळपास 5 लाख रुपये देण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांना शंका आल्यानंतर त्यांनी तपास करत या दोन खेळाडूंना ताब्यात घेऊन तपास केला होता. त्यानंतर आता या तिसऱ्या खेळाडूला देखील अटक करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके