क्रिकेटवरील ‘सट्टेबाजी’ कायदेशीर करावी, ‘या’ राज्याच्या माजी पोलिस महासंचालकांची मागणी

मोहाली : वृत्तसंस्था – क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी असे मत बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत. त्यामुळे सरकारला देखील फायदा होईल असे ही ते म्हणाले. अजितसिंग शेखावत हे राजस्थानचे माजी पोलीस महासंचालक आहेत.

मॅच फिक्सिंग संबंधित नियमांची गरज –
शेखावत यांनी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम आणि क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केली आहे. मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले. मॅच फिक्सिंग रोखणे शक्य नाही. त्यासाठी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सट्टेबाजीही कायदेशीर करावी असे त्यांनी सूचवले.

सट्टेबाजी कायदेशीर केली तर भ्रष्टाचार अटोक्यात येईल, तसेच त्यामुळे सरकारला देखील महसूल मिळेल असे शेखावत याचे मत आहे. त्यामुळे कोण सट्टेबाजी करतो आणि किती रक्कम लावण्यात येते याची माहिती देखील समोर येईल असे ही ते म्हणाले.

मागील वर्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह बारा खेळाडूंच्या विरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी, याशिवाय संशयित तामिळनाडू प्रीमिअर लीग आणि महिला क्रिकेटपटू सट्टेबाजांच्या संपर्कात आल्याच्या घटना ही घडल्या होत्या.