Matchbox Price | 14 वर्षानंतर महागणार ‘काडेपेटी’, दुप्पट होतील दर; उत्पादकांनी सांगितले ‘हे’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाईने हळुहळु प्रत्येक माणसावर, त्याच्या घरावर पूर्णपणे कब्जा केला आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून पेट्रोल-डिझेल (petrol diesel), स्वयंपाकाच्या गॅसचे (gas cylinder) दरही प्रचंड वाढले आहेत. आता प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात वेगळे महत्व असलेली छोटी दिसणारी माचिसची पेटी (Matchbox Price) सुद्धा महागणार आहे. माचिसच्या पेटीचे (Matchbox Price) दर 14 वर्षानंतर वाढणार आहेत. माचिसच्या पेटीची किंमत 1 रुपयांनी वाढून 2 रुपये होणार आहे.

माचिसचे दर वाढणार असल्याची बातमी सोशल मीडियावर खुप शेयर होत आहे. अनेक लोक यावर आपआपले मत मांडत आहेत.

 

डिसेंबरपासून माचिस 2 रुपयात
शेवटच्यावेळी माचिसच्या (Matchbox Price) किंमतीत वाढ 2007 मध्ये झाली होती. त्यावेळी तिची किंमत 50 पैशाने वाढून 1 रुपये करण्यात आली होती. 14 वर्षानंतर माचिसच्या पेटीचा दर वाढणार आहे. डिसेंबरपासून माचिस 2 रुपयात मिळेल.

 

उत्पादकांचा सर्वसंमतीने निर्णय
तमिळनाडुच्या शिवकाशीत आयोजित पाच प्रमुख माचिस उद्योग युनिटच्या प्रतिनिधींच्या बैठकीत (ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेस-All India Chamber Of Match Industries) माचिसची किंमत वाढवण्यावर सर्वसंमतीने निर्णय घेतला. प्रतिनिधींनी 1 डिसेंबरपासून माचिसची कमाल किरकोळ किंमत (MRP) 1 रुपयांनी वाढून 2 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कच्च्या मालाच्या किंमतीत प्रचंड वाढ
ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या (All India Chamber of Match Industry ) बैठकीत माचिस निर्मितीचा (Matchbox Price) खर्च वाढल्याच्या चर्चेनंतर किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत माचिस उत्पादकांनी म्हटले की, माचिस बनवण्यासाठी 14 प्रकारचा कच्चा माल आवश्यक असतो. आणि मागील काही काळात सर्व कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

 

महागाईने केला कहर
बैठकीत सांगण्यात आले की, एक किलोग्राम लाल फॉस्फरस 425 रुपयांवरून वाढून 810 रुपये, मेणाची किंमत 58 रुपयांवरून वाढून 80 रुपये किलो झाली आहे. बाहेरील बॉक्स बोर्ड 36 रुपयांवरून वाढून आता 55 रुपयात मिळत आहे आणि आतील बॉक्स बोर्ड 32 रुपये ते 58 रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय कागद, स्प्लिंटची किंमत, पोटॅशियम आणि सल्फरचे दर सुद्धा वाढले आहेत.

किरकोळ व्यापार्‍यांना इतक्याला पडते माचिस
नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्हीएस सेथुरथिनम यांनी म्हटले की,
माचिस उत्पादक 600 माचिसचा एक बंडल 270 रुपयांवरून 300 रुपयाला विकत आहेत.
एक माचिस बॉक्समध्ये 50 माचिसच्या काड्या येतात.
आता उत्पादकांनी माचिस विक्री किंमत 60 टक्के वाढवून 430-480 रुपये प्रति बंडल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि ट्रान्सपोर्ट खर्चाचा समावेश नाही.

 

महागाई इतकी वाढली की दुसरा पर्यायच नाही
14 वर्षापर्यंत माचिसवर महागाईचे सावट न पडण्याचे कारण सांगताना एका उत्पादकाने सांगितले की,
माचिसच्या पेटीवर सुद्धा महागाईचा मारा होतो, परंतु तिचा आकार आणि तिच्या काड्यांच्या संख्येत बदल करून ती सामान्य माणसांसाठी स्वस्त ठेवली जाते.
परंतु, आता खर्च इतका वाढला आहे की, दरात वाढ केल्याशिवाय काहीही होणार नाही.

 

Web Title :- Matchbox Price | matchbox price to increase know matchbox price new price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात

Supreme Court | आर्थिक दुर्बल आरक्षण ! ‘आठ लाख उत्पन्नाचा आकडा कशाच्या आधारे निश्चित केला? निकष सांगा, अन्यथा आरक्षण रोखू’

Captain Amarinder Singh | पंजाबच्या राजकारणात नवा वाद ! तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची ‘खमंग’ चर्चा