17 वर्षाच्या पथिरानानं तोडलं शोएब अख्तरचं 17 वर्षापुर्वीच रेकॉर्ड, टाकला 175 Km/h वेगानं बॉल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला एक नवीन ‘लसिथ मलिंगा’ मिळाला आहे. मथिशा पाथिराना या गोलंदाजाचा तीन-चार महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे तो चर्चेत आहे. अंडर १९ विश्वचषकात या १७ वर्षाच्या वेगवान गोलंदाजानं आश्चर्यकारक काम केलं आहे. पथिरानाने रविवारी भारतीय अंडर १९ संघाविरुद्ध १७५ किमी / ताशी वेगाने गोलंदाजी केली.

दरम्यान, हा स्पीडोमीटरचा दोष होता किंवा कोणती चूक हे माहित नाही. कारण जेव्हा त्याने बॉल फेकला तेव्हा टीव्ही स्क्रीनवर दर्शविलेला वेग 175 किमी प्रति तास होता. दरम्यान, चेंडू वाइड झाला. या संदर्भात आयसीसीकडून कोणतेही अधिकृत विधान आले नाही. पाथिरानाच्या या चेंडूचा सामना भारताच्या यशस्वी जयस्वालला करावा लागला. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू जयस्वालच्या पायापासून गेला, ज्याला अंपायरने वाइड सांगितले. जर हे सत्य असेल तर या 17 वर्षीय वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा विक्रम मोडला आहे.

Image result for 17 साल के पथिराना ने तोड़ा अख्तर का 17 साल पुराना रिकॉर्ड, फेंकी 175 Km/h की रफ्तार से गेंद!

दरम्यान, २००३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात १६१.३ किमी प्रतितास वेगाने वेगवान गोलंदाजी करण्याचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे. या 17 वर्षीय वेगवान गोलंदाजची ऍक्शन लसिथ मलिंगासारखी आहे. पाथिराणा काही महिन्यांपूर्वी ट्रिनिटी कॉलेजकडून खेळत होता, जिथे त्याने सात धावा देऊन सहा विकेट घेतल्या.

फेसबुक पेज लाईक करा –