मुलीला जोडीदार न मिळाल्याने मॅट्रोमोनियल एजन्सीला 62 हजारांचा दंड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नासाठी मॅट्रोमोनियल साईट्सचा सहारा घेणं कॉमन गोष्ट आहे. परंतु असे क्वचितच घडले असेल की, वेबसाईटवर नवरा शोधण्यात कोणीतरी अयशस्वी झालं असेल. यानंतर त्याला व्यक्तीला त्याची रक्कमही परत मिळते तेही व्याजासहित. चंदीगढच्या ग्राहक न्यायालयाने वेडिंग विश प्रायव्हेट लिमिटेडला त्या ग्राहकाला व्याजासहित सर्व्हिज चार्ज तसेच खटल्याची फी देण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरेंद्र पाल सिंह चहल आणि त्यांची पत्नी नरेंद्र कौर चहल यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी चंदीगढ ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती की, ते 2017 मध्ये आपल्या मुलीसाठी हरियाणा सरकारमध्ये कार्यरत असलेला ऑफिसर नवरा शोधत होते. मॅट्रोमोनियल एजन्सीने चहल दम्पत्यांना संपर्क करून आपल्या सेवेबद्दल सांगितले. चहल यांच्या मुलीला मंगळ आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी एजन्सीला चंदीगढ किंवा आसपासच्या डॉक्टरांची प्रोफाईल दाखवण्यास सांगितले जो जाट आणि मंगळ असलेला असेल.

मॅट्रोमोनियल साईटने वायदा केला होता की, रजिस्ट्रेशननंतर 9 महिन्यांच्या आत ते कमीत कमी 18 योग्य लोकांची प्रोफाईल दाखवतील. चहल दाम्पत्याने 26 सप्टेंबर 2017 रोजी 50 हजार रुपये देऊन अॅग्रीमेंट साईन केलं आणि रॉयल पॅकेजचे सदस्यत्व घेतलं.

चहल दाम्पत्याने तक्रारीत म्हटले की, त्यांना एजंसीने त्यांच्या मागणीनुसार प्रोफाईल दाखवले नाही. एजन्सीने चंदीगढच्या बाहेर 60 किमी अंतरही वाढवण्यासही परवानगी घेतली. दीर्घकाळ गेल्यानंतर एजन्सीला त्यांनी 22 ऑक्टोबर 2018 रोजी नोटीस पाठवली.

यानतंर वेडिंग विश कंपनीने या नोटीशीला उत्तर देणंही गरजेचं वाटलं नाही. यानंतर चहल दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली. एजंसीने दावा केला की, त्यांनी चहल दाम्पत्याला अनेक प्रोफाईल दाखवल्या ज्या त्यांनी रिजेक्ट केल्या होत्या. नंतर फी न घेता अनेक प्रोफाईल दाखवण्यात आल्या.

न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय देण्यात आला की, मॅट्रीमोनियल एजंसीने ग्राहकाचा वेळ आणि पैसे वाया घालवला. अनेक दिवस जाऊनही एजन्सी एकही मुलगा समोर आणू शकली नाही. त्यामुळे आता एजन्सीने ग्राहकाला 50 हजार रुपये 9 टक्के व्याजासहित, 7 हजार रुपये वर्षाची नुकसान भरपाई आणि 5 हजार रुपये कायद्याची फी दंडाच्या रुपात द्यावे.