मऊच्या कन्येने जिंकला ‘मिस इंडिया युनिव्हर्स 2020’ चा किताब, गावात आनंदाची लाट

मऊ : उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात राहणारी वैष्णवी सिंहने लुधियाना-पंजाबमध्ये इम्पिरियल ग्लिट्झद्वारे आयोजित मिस इंडिया युनिव्हर्स 2020 चा किताब जिंकून संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. वैष्णवी सिंह (20) बीएससी द्वितीय वर्षाची एएफएफटी फिल्म सिटी नोएडाची विद्यार्थीनी आहे. कुटुंबियांनी सांगितले की, वैष्णवी अभ्यासात खुप हुशार आहे.

शिक्षणासह मॉडलिंगच्या क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न असल्याने तिने मिस इंडियासाठी तयारी सुरू केली होती आणि कोरोना काळ सुरू झाल्यानंतर आशा नव्हती की आयोजन यावेळी होऊ शकेल. मात्र, वेळेवर आयोजन सुरू झाल्यानंतर तयारीला रंग चढला आणि वैष्णवीच्या प्रतिभेने तिला जे हवे होते तिथे पोहचवले.

मऊ जिल्ह्यातील वैष्णवी सिंहला मिस इंडिया युनिव्हर्स 2020 चा किताब मिळाल्याची माहिती मिळताच तिच्या घरी अभिनंदन करणार्‍यांची गर्दी झाली आहे. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर तिचे वडिल डॉ. एच. एन सिंह पटेल हे आनंदित झाले आहेत. त्यांनी म्हटले की, आता ती पुढील तयारीला लागली आहे, जेणेकरून देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करता येईल.

You might also like