‘देशातील प्रत्येक नागरिक हिंदुस्तानी मात्र हिंदू नाही’, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मौलाना तौकीर यांचा ‘पलटवार’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना आयएमसी प्रमुख मौलाना तौकीर म्हणाले, देशाच्या प्रत्येक नागरिकाला हिंदू म्हणणे चुकीचे आहे. सगळ्यांना तुम्ही हिंदुस्थानी अर्थात भारतीय म्हणू शकता परंतु हिंदू म्हणू शकत नाही. बरेली येथे बोलताना भागवत म्हणाले होते की, हिंदूंना त्यांच्या पूजा पद्धतीवरून समजू नका तर हिंदुस्थानात राहणार व्यक्ती हिंदू आहे.

यावर मौलाना तौकीर यांनी नाराजी व्यक्त करत भाष्य केले आहे. मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारतात हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन अशा अनेक धर्माचे लोक आहेत आणि सगळे आपल्या आपल्या धर्माप्रमाणे जगतात त्यामुळे हिंदू हा मुसलमान असू शकत नाही आणि मुसलमान हा हिंदू असू शकत नाही. तसेच लोकसंख्येबाबत बोलताना मौलाना म्हणाले की, इस्लाममध्ये नसबंदीला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. मात्र मुसलमान 25-25 मुलं पैदा करतात असे म्हणणे चुकीचे असल्याचे देखील मौलाना यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस काळातील नसबंदी बाबतचा उल्लेख करताना मौलाना म्हणाले की, त्यावेळी मुफ्ती आजम हिंदने नसबंदीविरोधात फतवा देखील जारी केला होता. आम्हाला देशाच्या तुकडे नको आहेत ते तर येथील राज्यकर्त्यानीच केलेले आहेत असे देखील मौलाना यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –