माऊलींच्या अश्वाचे पुणॆ मुक्कामात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचे आज सकाळी 7 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. अश्वाचे नाव हिरा असे होते. मागील आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला.

[amazon_link asins=’B01352T2DK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5941f76d-8275-11e8-a643-79c5fa170916′]

आळंदीहून काल 7 जुलैला पालखीसह अश्वांनी प्रस्थान केले होते. 30 किलोमीटर अंतर् चालून अश्व काल रात्री पुणे येथे मुक्कामी पोचले होते. आज सकाळी ही दुखद घटना घडली. ही माहिती बाहेर येताच वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरित आगमन होणार आहे.

अश्वाचे मृत्यूसमयी वय बारा ते तेरा वर्षाचे होते . पालखी प्रस्थान दिवशी तो श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली जि. बेळगांव या गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता . त्याने आळंदी ते पुणे या ३० किलोमीटरच्या वाटचालीत माऊलीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली.