Paush (darsh) Amavasya 2021 : आज पौष अमावस्येच्या दिवशी करू नयेत ‘ही’ 7 कामं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज पौष अमावस्या आहे. यास मौनी आमावस्या सुद्धा म्हटले जाते. उद्यापासून माघ मास सुरू होत आहे. आजच्या दिवशी पित्रांचे स्मरण करून त्यांच्या नावावर स्नान, दान केले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने वाकसिद्धी प्राप्त होते. या दिवशी जप-तप शुभ मानले जाते. तर काही विशेष कामे करण्यास मनाई सुद्धा असते. जाणून घेवूयात याबाबत…

1 आजच्या दिवशी उशीरापर्यंत झोपून राहू नका. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे. जर तुम्ही एखाद्या पवित्र नदीत स्नान करू शकला नाहीत तर घरी आवश्य स्नान करा. स्नान केल्यानंतर सूर्य अर्ध्य देण्यास विसरू नका. स्नान होईपर्यंत काहीही बोलू नका, मौन राहा.

2 अमावस्येला स्मशान किंवा कब्रस्थानजवळ फिरू नये. अमावस्येच्या रात्री सर्वात जास्त काळोखी रात्र असते आणि मानले जाते की, यावेळी वाईट आत्मा आणि शक्ती खुप सक्रिय होतात. यासाठी अमावस्येच्या रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी जाऊ नये.

3 अमावस्येला संयम बाळगावा. या दिवशी पुरुष आणि स्त्रीने लैंगिक संबंध ठेवू नये. गरुड पुराणानुसार, अमावस्येला लैंगिक संबंध ठेवल्यास निर्माण होणारी संतती आजीवन सुखी राहात नाही.

4 अमावस्येच्या दिवशी घरात शांततेचे वातावरण असावे. आजच्या दिवशी घरात भांडण झाले तर पित्रांची कृपा होत नाही. म्हणून भांडणापासून दूर राहावे. यादिवशी वाईट अजिबात बोलू नये.

5 अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने शुभफळ मिळते. परंतु, शनिवारशिवाय अन्य दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावू नये. यासाठी पिंपळाला स्पर्श करू नका.

6 या दिवशी बिछाण्यावर नव्हे, तर चटईवर झोपावे. अमावस्येच्या दिवशी तेल लावण्यास मनाई आहे. उपवास असेल तर शृंगार करू नये.

7 या दिवशी दारू, मांस यांचे सेवन करू नये. साधे भोजन करावे. जास्तीत जास्त मौन पाळून ध्यान लावावे.