Mausam Ki Jankari : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप जारी, अनेक राज्यांत थंडीच्या लाटेने जनजीवन प्रभावित, IMD ने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर भारताच्या अनेक भागात कड्याक्याची थंडी पडली आहे. ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये धुके आणि थंडीच्या लाटेने जनजीवन प्रभावित झाले आहे. तर हवामान विभागाने पुन्हा एकदा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भीषण बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये धुक्यासह थंडीच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य प्रदेशात सुद्धा थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. सोबतच ओडिसामध्ये सुद्धा धुके पडू शकते. हवामान विभागानुसार, शनिवारी अरुणाचल प्रदेशात मेघगर्जनेसह विजा चमकू शकतात आणि काही भागात गारा पडू शकतात.

* दिल्लीत शुक्रवारी थंडीची लाट कायम होती आणि किमान तापमान चार डिग्री सेल्सियस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा पाच डिग्री कमी आहे.

* उत्तर प्रदेशात अनेक भागात हलके धुके होते आणि लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामाना करावा लागत आहे. येथे सर्वात कमी तापमान 1.2 डिग्री सेल्सियस इटावामध्ये नोंदले गेले.

* श्रीनगरमध्ये पारा दोन डिग्री आणखी खाली घसरला आहे. खोर्‍याच्या बहुतांश क्षेत्रात किमान तापमान शून्य ते 10 डिग्री सेल्सियसच्या खाली असल्याने शुक्रवारी काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेचा प्रकोप वाढला आहे.

* राजस्थानमध्ये कडाक्याच्या थंडीत पर्यटन स्थळ माऊंट आबूमध्ये पारा लागोपाठ शून्याच्या खाली कायम आहे.