यावेळी दिल्ली असणार कडाक्याची थंडी, 2 डिग्रीपर्यंत घसरू शकते तापमान, तर येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पर्वतांवरील बर्फवृष्टीमुळे मैदानी राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. दिल्लीत पारा 4 डिग्रीपर्यंत घसरला आहे. हवामान विभागाने (आयएमडी) आज म्हणजे 16 डिसेंबरला दिल्लीचा पारा 4 डिग्रीपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू आहे, त्याचे मुख्य कारण पर्वतांवर मोठी बर्फवृष्टी सुरू आहे.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जबरदस्त बर्फवृष्टी होत आहे. हवामान विभागानुसार, पर्वतांवर जेवढी बर्फवृष्टी आणि पाऊस होईल, तेवढीच थंडी वाढेल. दिल्लीचे कमाल तापमान बुधवारी 18 डिग्री सेल्सियस आहे.

दिल्लीत 2 डिग्रीपर्यंत घसरू शकते तापमान
हवामान विभागाचा अंदाज आहे की, दोन-तीन दिवसांमध्ये उत्तर भारताच्या तापमानात तीन डिग्री सेल्सियसची घसरण होऊ शकते. हवामानाच्या अंदाजानुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीचे तापमान 2 डिग्री पेक्षा खाली जाऊ शकते. दिल्लीच नव्हे तर पंजाबमध्ये सुद्धा थंडीचा कहर वाढेल. उत्तर भारताचा पारा घसरून 3-5 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचू शकतो.

पर्वतांवरील ही बर्फवृष्टी उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशांमध्ये राहणार्‍या लोकांचा थरकाप उडवत आहे. हवामान विभागानुसार, उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात राहणार्‍या लोकांना पुढील दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीसाठी तयार राहावे लागेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या तापमानात घसरून होऊ शकते. तर, मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुदुचेरी, केरळ आणि तमिळनाडुत 17-18 डिसेंबरला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

तर हरियाणा, चंडीगढ आणि उत्तर पश्चिम राजस्थानमध्ये सुद्धा थंडी विक्रम मोडणार आहे. तापमान घसरल्याने उत्तर भारताच्या बहुतांश भागात धुक्याचा परिणाम दिसून येत आहे. मात्र, थंड वारे वाहत असल्याने दिल्ली-एनसीआर आणि युपीतील हवेच्या गुणवत्तेत (एक्युआय) सुधारणा झाली आहे.

राजस्थानच्या अनेक शहरात पारा घसरला
राजस्थानच्या अनेक शहरात किमान तापमान 10 डिग्रीपर्यंत पोहचले आहे. हवामान विभागानुसार, राज्यातील पर्वतीय भाग माऊंट आबूमध्ये कमाल तपामान 1.4 डिग्री नोंदले गेले आहे.

पर्वतांवर मोठी बर्फवृष्टी
उत्तराखंड, हिमाचलपासून जम्मू काश्मीरात सध्या मोठी बर्फवृष्टी होत आहे. या राज्यांच्या बहुतांश भागात बर्फाची सफेद चादर पसरलेली आहे. केदारनाथ धाममध्ये 4 फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे. केदारनाथ धामला जोडणारी 18 किमी पायी मार्ग सुद्धा बर्फाखाली गेला आहे. उत्तराखंड ते रुद्रप्रयाग, औली आणि बागेश्वरमध्ये भयंकर बर्फवृष्टी होत आहे, तर हिमाचल प्रदेशाच्या लाहौल स्पीतीपासून मंडीमध्ये सर्वत्र बर्फच बर्फ आहे.