माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीतही राष्ट्रवादीचा पराभव : विजयसिंह मोहिते पाटील

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – माढ्यातच नाही तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागेल. असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. अकलूज येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यामद्ये महाराष्ट्रातील १४ मतदार संघांचा समावेश आहे. याचदरम्यान, एका आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका. अशी टीका केली होती. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर दिले. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागणार आहे. शरद पवारांनी माझ्यावर जी टीका केली आहे. त्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. असे विजयसिंह मोहिते पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले? असा सवालही जयसिंह मोहिते पाटील यांनी केला.

Loading...
You might also like