लोणावळा: Maval Assembly Election 2024 | यंदा राज्यात मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke MLA) उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात बंडखोरी करत बापू भेगडेंनी (Bapu Bhegade) आव्हान दिलं आहे. दरम्यान मावळातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
लोणावळ्यात सुनील शेळके आणि बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करण्यासाठी गेले होते. लोणावळ्यातील राम मंदिरात शेळके यांनी दर्शन घेतले.
दरम्यान अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांच्यावर आरोप केले, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंदिरातून निघून जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दीक वाद झाला. राम मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान दोन्ही बाजूनी घोषणाबाजी सुरु होती. त्यानंतर परिसरात तणाव वाढला होता.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. शेळके- भेगडे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने धक्काबुक्की झाली. भेगडे यांच्याकडे कुठवाही मुद्दा नसल्याने ते मतदारसंघात दहशत निर्माण करीत आहेत, असा आरोप सुनील शेळके यांनी केला. भेगडे यांनीही शेळकेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
Bhor Assembly Election 2024 | महायुतीने उमेदवार शंकर मांडेकर यांचा घणाघात; म्हणाले –
‘गुंजवणी धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न 25 वर्षे का रेंगाळला? पुनवर्सित वसाहती दुर्लक्षित, सुविधा देण्यात आमदार अपयशी’