वडगाव मावळ परिसरात इंद्रायणी नदीत कार कोसळली, 3 जण आडकले

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – इंद्रायणी नदीमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास एक कार कोसळली. कारमध्ये तीन जणांपैकी एकाला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांना वाचवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हा अपघात आज दुपारी कान्हे ते टाकवे या रोडवर घडली. अक्षय संजय ढगे (वय-२० रा. टाकवे बु. ता.मावळ) याला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले आहे.

चालक संकेत नंदु आसवले (वय-२०) आणि अक्षय मनोहर जगताप (वय-२०) या दोघांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेजण स्विफ्ट कारमधून कान्हे येथून टाकवेच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालक संकेत याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार इंद्राणयी नदी पात्रात कोसळली. या घटनेची माहिती मिळतात वाडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पथकाने अक्षय ढगे याला रेस्क्यू करून बाहेर काढले. नदी पात्रात पाणी जास्त असल्याने संकेत आणि अक्षय हे दोघे पाण्यात अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक व शिवदुर्गचे पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वडगाव मावळचे तहसिलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like