…म्हणून मावळ मतदार संघ ठरला ‘लक्षवेधी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता महाराष्ट्रातील शेवटच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 तारखेला होणार आहे. राज्यात जोरदार चर्चा असलेल्या मावळ मतदार संघात देखील येत्या 29 तारखेला मतदान होणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार तर दुसरीकडे शिवसेनेकडून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघ आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारणेंना 5 लाख 12 हजार 223 मतं मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मतं मिळाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर तिसऱ्या स्थानावर होते. नार्वेकरांना 1 लाख 82 हजार 293 मतं मिळाली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शारद पवार यांनी स्वतः लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नातू पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरवले. यासाठी राष्ट्रवादीकडून हक्काच्या मावळ मतदार संघाची निवड करण्यात आली. राजकारणात नवख्या असलेल्या पार्थला यश मिळावं याकरिता संपूर्ण पवार परिवार मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. अजित पवार,सुप्रिया सुळे शरद पवार देखील पार्थच्या विजयासाठी धडपड करताना दिसले.

पहिल्या वहिल्या भाषणाचा गोंधळ

पार्थ पवार यांचे पहिले भाषण हे चांगलेच गाजले. या भाषणादरम्यान बोलताना पार्थ पवार अडखळल्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या. यावरून विरोधी पक्षांनी देखील पार्थ पवार यांच्यावर ‘ज्यांना बोलता येत नाही ते संसदेत नागरिकांचे प्रश्न काय मांडणार ‘? अशी टीका देखील करण्यात आली होती. त्यानंतर एका सभेसाठी जाताना ट्राफिक जॅम झल्यामुळे पळत जाणाऱ्या पार्थ यांचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. त्यानंतर सभा झाली नव्हतीच असे देखील सांगण्यात आले होते.

‘ते’ फोटो आणि पार्थ

नंतरच्या काळात मात्र पार्थ पवार यांच्या बाबत थोडे ,सकारात्मक चिन्ह दिसायला लागली होती. पण ऐन मतदानाचा दिवस जवळ असताना पार्थ पवार यांचे त्यांच्या मैत्रिणींसोबतचे पार्टी करतानाचे फोटोज व्हायरल झाले. मात्र त्याचे हे फोटो म्हणजे केवळ विरोधकांचा डाव असल्याचे सांगून पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आली.

सोशल मीडियासह अनेकवेळा टीका जरी झाल्या असल्या तरी मावळातील राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते आणि पावर घराण्याचे समर्थक पार्थ पवार यांचे लोकसभा निवडणुकीतील पारडे जड करणार असे दिसते आहे. एकूणच काय बारणे विरुद्ध पवार यांच्यात चुरस रंगणार असे चित्र आहे. एकीकडे तरुण नेतृत्व आणि दुसरीकडे अनुभवी राजकारणी अशी मावळ मतदार संघातील निवडणूक मोठी रंगदार होणार यात शंका नाही.