एकाच कुटुंबातील तिघांचा मावळातील धरणात बुडून मृत्यू

मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – कुटुंबासमवेत मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणाजवळ फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली असून मृतांमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हे कुटंब मावळतील त्यांच्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आले होते.

अनिल कोंडीबा कोळसे (वय- ५८), प्रितेश रघुनाथ आगळे (वय-३२), प्रशिल अमोल आढाव (वय- ०७ तिघे रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत.

खेड तालुक्यातील येवलेवाडी येथील एसटी महामंडळात बॉडी फिटरचे काम करणारे दादासाहेब गायकवाड यांच्याकडे त्यांची बहीण, मुलगी आणि भाची सुट्टीसाठी आले होते. आज दुपारी सर्वजण खेड तालुक्यातील जाधववाडी येथील धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. एनडीआरएफ कॅम्प येथील धरणात गायकवाड यांच्या बहीणीचे पती अनिल कोळसे यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी दादासाहेब याचा हात धरला. त्यामुळे ते आणि भाचा प्रशिल हे देखील पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी दादासाहेब यांचा जावई प्रीतेश पाण्यात उतरला.

या सर्वांना वाचवण्यासाठी दादासाहेब यांची पत्नी आणि मुलगी गेल्या. दरम्यान, इतर नातेवाईकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांचा आवाज ऐकून एनडीआरएफचे जवान बोटीसह घटनास्थळी पोहचले. जवानांनी दादासाहेब, त्यांची पत्नी आणी मुलीला बाहेर काढले. मात्र अनिल कोळसे, जावई प्रीतेश आगळे आणी भाचीचा मुलगा प्रशिल यांना मात्र वाचवता आले नाही.