Maval Lok Sabha Election 2024 | महायुतीच्या सभेत आरपीआयचा अपमान, पिंपरी-चिंचवडमधील प्रकार, पदाधिकाऱ्यांचा बारणेंच्या प्रचारावर बहिष्कार

पिंपरी-चिंचवड : Pimpri Chinchwad | मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या प्रचारानिमित्त पिंपरी-चिंचवड महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक आरपीआय आठवले गटाच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्यात आला. भरसभेत सर्वांसमक्ष अशाप्रकारची अवमानकारक वागणूक दिल्याने आरपीआय (RPI) पदाधिकाऱ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि निघून गेले.(Maval Lok Sabha Election 2024)

या बैठकीला उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासह अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्यासह सर्व मित्रपक्षांचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आरपीआय आठवले गटाचा शहराध्यक्ष वगळून सर्व मित्रपक्षांच्या शहराध्यक्षांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावण्यात आले. मात्र, आरपीआयच्या शहराध्यक्षाचा साधा नामोल्लेखही करण्यात आला नाही.

भरसभेत अशाप्रकारे अवमान झाल्याने आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी तिथून निघून गेले, त्यांनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत रामदास आठवले यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत आम्ही श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका आरपीआय पदाधिकाऱ्यांनी घेतली.

दरम्यान, आरपीआय पदाधिकारी निघून जात असताना शेजारून मंत्री उदय सामंत जात होते, त्यांनी या
नाराजीबाबत ऐकताच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
सामंत यांनी उमेदवार श्रीरंग बारणे यांना बोलावून शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणली, आणि
नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे : ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : धक्कादायक! सामोस्या मध्ये टाकले निरोध, दगड अन् गुटखा, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपनी मालकासह 5 जणांवर FIR

PM Narendra Modi | आज सायंकाळी PM मोदींची चंद्रपूरमध्ये सभा, आगमनापूर्वी म्हणाले महाराष्ट्रातील जनमानसाने महाप्रण केलाय…