मावळात राष्ट्रवादीचे नेवाळे यांचा राजीनामा, सुनील शेळके यांना मोठा ‘फटका’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ मतदार संघातुन पक्षाने उमेदवारी डावलेले राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षाला सोड चिट्ठी दिली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना मोठा फटका बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बाळासाहेब नेवाळे यांनी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास केला आहे. मागील पंधरा वर्षापासून ते विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे मागत असताना त्यांना कायम डावलण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. यावेळी ते उमेदवारी करिता तीव्र इच्छूक असताना देखील त्यांना डावलत ऐनवेळी भाजपात बंडखोरी करुन बाहेर पडलेले सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नेवाळे नाराज झाले होते.

नेवाळे यांना मानणारा मोठा वर्ग मावळच्या ग्रामीण भागात आहे. या सर्व कार्यकर्त्याँचा मेळावा घेऊन, चर्चा करुन नेवाळे यांनी आज हा निर्णय घेतला. वडगाव मावळ येथील भेगडे लाॅन्समध्ये मेळावा घेत दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला असून येत्या दोन दिवसात पुढील राजकिय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.

Visit : Policenama.com 

You might also like