Maval News | दुर्दैवी ! बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी धावला बाप, दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू

पुणे / कामशेत : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune district) मावळमध्ये (Maval News) धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मावळमधील (Maval News) कुसगाव खुर्द (kusgaon) येथे ही घटना घडली आहे. खोल पाण्याच्या डबक्यात पोहण्यासाठी उतलेली मुले पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली. परंतु तिघांचाही मृत्यू झाला.

पिराजी गणपती सुळे (वय-45), साई पिराजी सुळे (वय-14), सचिन पिराजी सुळे (वय-12 सर्व रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, मुळ गाव नायगाव वाडी, जि. नांदेड) असे मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पिराजी दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पहाण्यासाठी गेले होते. धबधब्याच्या पयथ्याशी मोठे डबके साचले आहे. या डबक्यात पोहण्यासाठी दोन मुले उतरली. मुले बुडू लागल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात पिराजी यांचाही बुडून मृत्यू झाला.

जवळच जनावरे राखणाऱ्या एका शेतकऱ्याने त्यांना बुडताना पाहिले.
तेव्हा त्यांनी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना गोळा केले.
त्यांना चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले. परंतु त्यांचा मृत्यू झाल होता.
पिराजी हा बिगारी काम करत होता.
या घटनेची माहिती कामशेत पोलिसांना (Kamshet Police Station) देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे येथे पाठविण्यात आले आहेत.

Web Title :- Maval News | two children including a father drowned in a waterfall in kusgaon maval in pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nalasopara Crime | नालासोपाऱ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2.5 लाखांचे कंडोम जप्त; एक तृतीयपंथी अन् तिघींची सुटका

Cracked Smartphone Screens | आता आपोआप रिपेयर होईल Phone ची तुटलेली स्क्रीन, जाणून घ्या काय आहे शोध

Pune Crime | कोंढव्यात टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्याने वार, एकाला अटक