Maval-Shirur Lok Sabha | मावळ, शिरूरमध्ये वंचितचे उमेदवार जाहीर, दोन्ही ठिकाणी आता तिरंगी लढत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Maval-Shirur Lok Sabha | वंचित बहुजन आघाडीने Vanchit Bahujan Aghadi (VBA) मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी (Madhavi Joshi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख (Aftab Anwar Maqbool Shaikh) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात आता तिरंगी लढती होणार आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.

कर्जत येथील माधवी जोशी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (Sharad Pawar NCP) निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकिट मिळाले नाही. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मावळची जागा ठाकरे गटाला (Shivsena UBT) गेल्याने जोशी यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आता मावळमध्ये महायुतीचे (Mahayuti) श्रीरंग बारणे (Shrirang Barne), महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे (Sanjog Waghere) आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्यात तिरंगी लढत होईल.

तर वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरूवातीला पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, नंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने आणि अजित पवारांच्या संपर्कात गेल्याने त्यांची उमेदवारी रद्द केली होती.

वंचितने आता शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
आता शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe),
अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil)
आणि वंचितचे आफताब अन्वर मकबूल शेख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत