मावळ बंदला प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी आणि काकासाहेब शिंदे या तरुणाला न्याय मिळण्यासाठी आज सकल मराठा मोर्च्याच्या मावळ पदाधिकाऱ्यांनी मावळ बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज सकाळ पासून मावळातील बाजारपेठा बंद आहेत. तर कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे फाटा, कार्ला फाटा येथे रस्ता रोको केला.  तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c39b8ea-9097-11e8-8d3a-97ba2f9504db’]

सकल मराठा क्रांती मोर्च्याचा पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाणे आणि जोगेश्वरीत आंदोलकांनी रेल्वे रोको करत सरकारविरोधातील संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी लोकल आणि एक्सप्रेसच्या गाड्यांवर चढून या गाड्या थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. तर काही आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवून लोकलवर दगडफेक केली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिरानं सुरू असून ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या आंदोलनामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

औरंगाबाद येथे मोर्चा दरम्यान काकासाहेब शिंदे पाटील या तरुणाने जलसमाधी घेतली. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. ठीक ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. आज मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावर तसेच संपूर्ण मावळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची संख्या तुरळक आहे. सोमटणे फाटा टोल नाका, कार्ला फाटा येथे रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र बंदला लागलेल्या हिंसक वळणामुळे मावळातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.