पुण्याचा पारा वाढला ; तर नागपूरात सर्वाधिक झळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळा सुरू झाला असून पारा दिवसेंदिवस आणखी वर जात आहे. त्यामुळे सध्या पुणेकर खूप हैराण झाले आहेत. त्यामुळे उष्णतेच्या झळा सहन करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. तर देशाच्या काही भागात उष्माघाताचे प्रकारही समोर आले आहेत.

शनिवारी पुण्यामध्ये ४१ अंश डीग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. तर राज्यात सर्वाधिक अकोला येथे ४३.२ अंश डीग्री सेल्सियसची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नागपूरमध्येही तापमानाचा पारा वाढला असून नागपूरात ४३. ३ अंश डीग्री सेल्सियअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागिल वर्षी नागपूरात सर्वाधिक ४६ अंश डीग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात किंचित वाढ होण्यची शक्यता वेध शाळेने वर्तवली आहे.