राजस्थानातील चुरु आणि पाकिस्तानातील जेकबाबाद येथे जगातील सर्वाधिक कमाल ‘तापमान’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – राजस्थानसह पश्चिम व मध्य भारतात उष्णतेची लाट आली आहे. त्याचा परिणाम राजस्थानमधील चुरु आणि पाकिस्तानातील जकोबाबाद येथे जगातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे.

२६ मे रोजी चुरु आणि जेकबाबाद येथे ५० अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
राजस्थानातील चुरु हे नेहमीच हॉट ठरत आले आहे. ५० अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान यापूर्वीही नोंदविले गेले होते. १९ मे २०१६ या दिवशी चुरु येथे ५०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या १० वर्षातील चुरु येथील हे दुसरे उच्चांकी कमाल तापमान आहे. विशेष म्हणजे तेथे रात्रीचे तापमानही उच्चांकी म्हणजे ३१.७ इतके नोंदविले गेले आहे.
चुरु येथे २० मे रोजी ४१.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. तेव्हापासून दररोज तापमान वाढत गेले.
२१ मे – ४४.५
२२ मे – ४६.६
२३ मे – ४५.६
२४ मे – ४७.४
२५ मे – ४७.५
२६ मे – ५०
२५ मे नंतर एकाच दिवसात अडीच अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होऊन ते ५० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like