मोठी बातमी ! काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत एक मतांनी आमदारांचा शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती सुत्रांकडे मिळत आहे.

काँग्रेसचे सर्व आमदार सध्या जयपूरमध्ये असून तेथे काँग्रेस आमदारांची बैठक झाली. त्याला काँग्रेसचे प्रभारी खर्गे हेही उपस्थित होते. यावेळी ४४ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा द्यावा, असे मत व्यक्त केले. मात्र, हा निर्णय आता जाहीर करु नये. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहून त्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात बैठक होऊन त्यानंतर हा निर्णय जाहीर करावा अशी मते या बैठकीत आमदारांनी व्यक्त केली आहे.

त्याचवेळी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे कधी येते हे पहावे असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यात तरुण आमदारांनी तर शिवसेनेबरोबर मंत्रिमंडळात सहभागी झाले तर ते सरकार स्थिर राहिल, असाही आग्रह धरला आहे. भाजपाची सत्ता नको यासाठी त्यांचा आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com