पुढील आठवड्या होऊ शकतो ‘कॅबिनेट’चा विस्तार, ‘एवढे’ नेते घेणार मंत्रीपदाची ‘शपथ’

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांनी केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर तीनही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज विधिमंडळामध्ये झालेल्या विश्वास ठराव देखील महाविकास आघडीने जिंकला. महाविकास आघाडीने 169 विरुद्ध 0 असा विश्वास ठराव जिंकला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने फ्लोर टेस्ट जिंकल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती कॅबिनेटच्या विस्ताराची. कॅबिनेटमध्ये कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे सरकचा कॅबिनेटचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यावेळी 14 मंत्री कॅबिनेटची शपथ घेण्याची शक्यता आहे. 14 मंत्र्यांमध्ये तीनही पक्षांचे किती नेते मंत्रीपदाची शपथ घेतात हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

‘महाआघाडीच्या सरकारने बहुमत सिद्ध केलं असलं तरीही विविध नेत्यांमध्ये गुफ्तगू सुरू आहे का,’ असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘असं काहीही नाही. तुम्ही उगाच अशा बातम्या चालवत जाऊ नका. असं काही वाटलं तर आधी मला फोन करत जा. मग मी सांगेन की असं झालं आहे की नाही. माझा फोन मी स्वत: उचलतो,’ असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.

Visit : Policenama.com