राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, ‘या’ ५ दिग्गजांना मिळणार मंत्रिपद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बहुप्रतिक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. उद्या अर्थात रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार ? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यानंतर लगेच नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात.

सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून त्याआधी हा विस्तार उरकून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आत अखेर याला मुहूर्त लागला असून उद्या नवनिर्वाचित मंत्री शपथ घेतील. राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार असून यासाठी मंडप टाकण्याच्या काम सुरू आहे. २०० ते ३०० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी तयारी सुरू आहे. मंत्रिमंडळात सध्या ७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या सात जागांवर कुणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या  माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना  मंत्रिमंडळात स्थान मिळते कि नाही, हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.