मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना पुन्हा ‘मुदतवाढ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्भवलेला सत्तासंघर्ष मिटला आहे. राज्यात सत्ता स्थापन झाली असली तरी देखील अद्याप खाते वाटप झाले नाही. असे असताना मुंबई पोलीस आयुक्तपदाबाबत सध्या चर्चा सुरु आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना 3 महिन्यांपूर्वी मुदतवाढ दिली होती. बर्वे यांना देण्यात आलेली मुदत शनिवारी (दि.30) संपत आहे. कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. बर्वे यांना मुदत वाढ द्यावी की नाही याबाबत ‘महाविकास’ आघाडीत 2 वेगवेगळे मत प्रवाह आहेत पण सद्यस्थितीत बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
IPS Sanjay Barve
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती. संजय बर्वे यांना देण्यात आलेली तीन महिन्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. काल नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा आणि 6 मंत्र्यांचा शपथविधी झाला. अद्याप मंत्रालयातील विभागांचे वाटप झाले नाही. त्यामुळे संजय बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com